| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी दुपारच्या सुमारास घोडागाडी चालवणार्या विनोद आंबुकर यांना हा मृत डॉल्फिन मासा आढळून आला आहे. त्यांनी तात्काळ आमच्या प्रतिनिधींना संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी घटनास्थळी प्रतिनिधी दाखल झाले व सदर माशाचे छायाचित्रे काढून वनखाते व नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली. समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळल्याने प्राणी मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे.
समुद्रातील वाढते प्रदूषण हे समुद्री जिवांच्या जिवावर बेतत आहे. दरवर्षी कित्येक डॉल्फिन व कासव समुद्रकिनारी मृत अवस्थेत सापडत आहेत. तरीसुद्धा या समुद्री जिवांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे हे समुद्री जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.