प्रवाशांसाठी सूचना! खंडाळा घाटात दरड कोसळली

। खोपोली । प्रतिनिधी ।
पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. दरड हटविण्याचे काम सुरु असून पुण्याहून-मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.

तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे.

Exit mobile version