हॉटेलमध्ये सिलेंडरने घेतला पेट

सिलेंडर रस्त्यावर फेकल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड नाक्यावर असणार्‍या छोट्या हॉटेलमध्ये सिलेंडरने पेट घेतला व हॉटेल व्यावसायिक यांनी हा सिलेंडर रस्त्यावर फेकून दिला. या ठिकाणी कोलाड आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल होऊन त्यांनी पेट घेतलेला सिलेंडर विझवला यामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे कि, मुंबई गोवा हायवेवरील कोलाड नाक्यावरील असणार्‍या सहादेव यांच्या छोट्या हॉटेलमध्ये गुरुवार दि.22 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सिलेंडरने पेट घेतला. हे हॉटेल व्यावसायिक यांच्या लक्षात येताच हॉटेल व्यावसायिकाने हा सिलेंडर रस्त्यावर फेकून दिला. त्वरीत येथे कोलाड आपत्ती व्यावस्थापनाची सागर दहिंबेकर यांची टीम दाखल होऊन त्यांनी अथक प्रयत्नाने हा सिलेंडर विझविला व मोठा अनर्थ टळला.

Exit mobile version