किरवली येथे श्रमदानातून बांधला बंधारा

विद्यार्थी आणि कृषी विभाग यांनी

| नेरळ | प्रतिनिधी |

कृषी विभागाच्या माध्यमातून किरवली येथील नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. कृषी विभाग आणि तेथील कालभैरव माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला. किरवली येथून वाहणारा नाला हा उन्हाळ्यात आटत असतो आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडचणींचा ठरत असतो. त्यामुळे कृषी विभागाने त्या नाल्यावर वनराई बंधारा बांधून पाणी अडविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमास कालभैरव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. साधारण 40 मीटर लांबीचा वनराई त्या ठिकणी बांधण्यात यश आले आहेत. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी,ग्रामपंचायत मधील माजी उपसरपंच संजय बडेकर,गावाचे पोलीस पाटील विवेक बडेकर,तसेच स्थानिक ग्रामस्थ शरद पवार,शरद बडेकर,विश्वनाथ बडेकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि कृषी सहायक मंगेश गलांडे,नितीन भानवसे आदी नि श्रमदान केले.

Exit mobile version