ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा

| तळा | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत वाशी हवेली येथे ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. भात कापणी झाल्यानंतर उन्हाळी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारे बांधण्यात येतात. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळी भाजीपाला तसेच पशु-पक्षांना पाण्याची कमतरता जाणवत नाही. तसेच या बंधाऱ्यामुळे नदीतील पाणीसाठा वाढून शेतकरी व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार असून गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामस्थांनी दगड, माती व सिमेंटच्या पिशव्यांच्या साहाय्याने श्रमदानातून हा बंधारा बांधून पूर्ण केला. याप्रसंगी कृषी विभागाचे गोविंद पाशीमे, वाशी हवेलीचे माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी सदस्य,गावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version