गोदी कर्मचार्‍यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन

| मुंबई | प्रतिनिधी |

फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशन ऑफ डॉक लेबर सुपरवाईझरी स्टाफया संस्थेच्या 45 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, डॉकयार्ड रोड स्टेशन जवळच्या खुल्या मैदानात फाऊंडेशनच्या आजी-माजी सभासदांचा कौटुंबिक स्नेहसंमेलन मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.

कौटुंबिक स्नेहसम्मेलनास आजी माजी सभासद आपल्या कुटुंबासहीत आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस.के. शेट्ये, फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य इनामदार, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव सावबा यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी विश्‍वस्त व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अ‍ॅण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे विश्‍वस्त दत्ता खेसे उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अरुण वचकल यांचा सहपत्नी तसेच सभासद राजीव साफळे यांना असि. ट्रॅफिक मॅनेजर या पदावर बढती मिळाल्या बद्दल एस. के शेट्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशनचे माजी पदाधिकारी तसेच विद्यमान लेबर एक्सिक्युटीव्ह निसार युनूस मिर यांचा ही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विष्णू सस्ते यांनी केले तर प्रास्ताविक भाषण फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशनचे माजी जनरल सेक्रेटरी विजय सोमा सावंत यांनी केले. आभार माजी सहखजिनदार अरुण बाळू वचकल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय सोमा सावंत, राजीव लक्ष्मण सावबा, सुनिल राजाराम शिर्के, विष्णू प्रभाकर सस्ते, यशवंत नारायण नाईक, चंद्रराव मुसालय्या कनकटाला, चंद्रशेखर महादेव राऊळ, लक्ष्मीकांत पुरुषोत्तम जांगडे, अरुण बाळू वचकल, प्रदीप श्रीधर गोलतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version