। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला येथे खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकवासला येथील दिलीप नामदेव मते (68) याने एका 10 वर्षाच्या मुलीला खाऊसाठी पैसे देतो असे सांगून घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, तक्रार समजून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मुलींना बाजूला घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता या पीडित मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.