| पेण | प्रतिनिधी |
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना पेण तालुक्यातील कामार्ली येथे घडली आहे. उपचारासाठी आलेल्या एका महिला रुग्णावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. संतोष रेवणगोल याला अटक केली आहे.
पेण कामार्ली येथील डॉ. संतोष रेवणगोल याच्या क्लिनिकमध्ये पीडित महिलेला उपचारासाठी पतीने नेले असता डॉक्टरने तिला सलाईन लावली. दरम्यान, महिला झोपलेली असताना डॉ. संतोष रेवणगोलने पीडितेच्या बेडवर बसून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद नोंदविली असून, भा.द.वी.स. कलम 376(2)(ई) नुसार गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत असून, आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.