। दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीतील गोकुळपुरी भागात शुक्रवारी रात्री उशिरा झोपडपट्टीला आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यानंतर माहिती मिळताच तात्काळ पथके घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाला 7 जळालेले मृतदेह सापडले. दरम्यान, दिल्ली अग्निशमन विभागानं या 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. याबाबचा अधिक तपास पोलिस करत आहेत.