खालापुरात चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी

| पाताळगंगा | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माजगाव, आंबिवली या गावांमध्ये गुरुवारी रात्री चोरट्यांनी घरात घुसून घरफोडी केली. मात्र, वारदमध्ये ग्रामस्थांची चाहूल लागताच त्यांनी धूम ठोकली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास येताच, तात्काळ सरपंच, खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी येऊन घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचातीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन काही धागेदोरे हातात लागतात का, याची माहिती घेण्यात आली.

या चोऱ्यांमुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्याजवळ धारदार हत्यारे, तसेच गुंगीचे औषधे असल्यांचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणीही चोरांना पाहिले नसल्यामुळे, सीसीटिव्हीच्या आधारे रात्री चोर रस्त्यावरुन जात असल्याचे तीन चोर निदर्शनास आले. मात्र, नक्की ही चोरांची टोळी किती होती, कोणीही ठाम पणे सांगू शकले नाही. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे आंदाज बांधून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास सोपे जाणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या तालुक्यात चोरांनी धुमाकूळ घातल्यामुळे महिलांनी आपले मौल्यवान वस्तू कोठे ठेवायाची हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यातच लग्न समारंभ असल्यामुळे महिला अंगावर दागिणे घालत असतात. मात्र, आपण घातलेले दागिने पुन्हा बघण्यास मिळेतील की नाही, ही मोठी भीती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version