पोलीस निरीक्षक सचिन पवारांच्या पुढाकारातून उपक्रम
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड आहे, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सचिन पवार यांनी स्वखर्चातून सद्यःस्थितीत 10 हजार वह्यांसह 500 गणवेश वाटप करत अनोखा उपक्रम हाती घेतल्याने खालापूर पोलीस ठाण्याच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, वाटप करण्यात आलेल्या वह्यांच्या मुखपृष्ठावर डायल 112, चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 , सायबर क्राईम तक्रारी संदर्भात 1930 व सायबर वेबसाईट यांची माहिती तसेच महिलांसाठी विशेष हेल्पलाइन नंबर आणि पाठीमागील पृष्ठावर खालापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस काका-पोलीस दीदी यांचे फोटो नाव व संपर्क क्रमांक नमूद केलेले आहेत. दहा हजारांहून अधिक वह्यांचे वाटप करीत 500 गणवेश वाटप केल्याने या पोलीस बांधवांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विद्यार्थिनी चेहर्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला आहे.