विरजोलीत चोरट्यांचा धुमाकूळ

| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील विरजोली परिसरात चोरट्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून, चोर्‍यांच्या घटना वाढत आहेत. येथील एका फार्म हाऊसमधील इलेक्ट्रिक केबलची चोरी झाल्याची घटना दि. 21 ऑगस्ट रोजी घडली. याबाबत येथील फार्म हाऊसचे मालक नम्रता नारायण पानसरे यांनी या घटनेची रोहा पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे. येथे असलेल्या दोन्ही बोअरवेलची इलेक्ट्रिक सप्लायर केबल कापून केबलची चोरी करून चोरटे पसार झाले. साधारणपणे 600 मीटर लांबीला असणार्‍या या केबलची किंमत जवळपास रू.40 हजार इतकी आहे.

Exit mobile version