। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. शिवसेना ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख आणि नितीन सावंत यांचे माध्यमातून स्मारक उभे राहत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांच्या प्रसाराचा आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष प्रयत्न या कार्यक्रमात झाला. स्मारकाच्या सुशोभीकरणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीची लवकरच सुरुवात होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. बौद्ध समाजातील शेकडो बांधव, नागरिक, आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजातील एकतेचा संदेश दिला. यावेळी बौद्ध समाजातील मान्यवर उपस्थित होते.
60 लाख खर्चून
होणार सुशोभिकरण..
नितीन सावंत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करणार आहेत. 13 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभित करण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी साधारण 60 लाख खर्च येणार असून तो सर्व खर्च नितीन सावंत यांच्या माध्यमातून होणार आहे.