| माणगांव | प्रतिनिधी |
बिबट्याच्या नख्यांची विक्री करीत असताना टोळीतील चार अरोपींना गजाआड केले आहे व 10 बिबट्याची नखे वनविभाग माणगांव व माणगांव पोलिसांनी जप्त केली आहेत.
तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभार्ते गावच्या हद्दीत पोलीस व वनविभागाच्या संयुक्त कारवाई दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे, वय 45 वर्ष, रा. निजामपूर बोरवाडी रोड व नईम अजीज शेख, वय 32 वर्ष, रा. निजामपूर बोरवाडी रोड यांना बिबट्याची नखे विकत असताना सापळा रचून रंगेहाथ पकडले. उर्वरित आरोपी दत्ता अनंत पवार, वय 22 वर्ष, रा. बेलवाडी कांदले, रोहा व मंगेश गिरीजा पवार, वय 35 वर्ष, रा. गारबट वाडी, रोहा याना दि. 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.