। अलिबाग । वार्ताहर ।
रसायनी गुळसुंदे येथे सकाळच्या सुमारास महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे.गुळसू़ंदे येथील नूतन मोरेश्वर मोकल (वय 48) ह्या सकाळच्या सुमारास हायस्कूलच्या थोडा पुढ रस्त्यातून चालत जात असताना अज्ञात चोरटा पाठीमागून धावत आला. आणि अचानक नुतन यांच्या चेहर्यावर मिरची पावडर लावून त्यांना धक्का देऊन खाली पाडून नूतन यांच्या गळ्यातील 40 हजार किंमतीची 12,330 ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली माळ गळ्यातून खेचून ओसाड मोकळ्या माळरानातून पळून निघून गेला.