अलिबाग चॅम्पीयन ट्रॉफी 2025
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जल्लोषात झाला.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक,अॅड निता पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, सतीश प्रधान, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, गजेंद्र दळी, संजना कीर, वृषाली पाटील, काका ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, नागेश कुलकर्णी, अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती अॅड. विजय पेढवी, अशोक प्रधान, द्वारकानाथ पाटील, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, आदींसह वेगवेगळ्या संघाचे मालक, कर्णधार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रेक्षणीय सामना पत्रकार विरुध्द वकील यांच्यामध्ये झाला. त्यात वकील संघ विजयी ठरला असून मालिकावीराचा सन्मान अॅड. महेश म्हात्रे यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 11 जानेवारीपर्यंत होणार्या क्रिकेट स्पर्धेत साखरमधील प्रदिप स्पोर्ट्स, अलिबागमधील कुबेर इलेव्हन, अलिबागमधील यु.व्ही. स्पोर्ट्स, अलिबागमधील आर्यन स्ट्रायकर्स, अलिबागमधील फैझी इलेव्हन, नवगांवमधील रियांश इलेव्हन, वरसोली येथील त्रिश्राव्या इलेव्हन, आंबेपूरमधील एस.पी. सुपर प्लेअर्स, म्हात्रोळी येथील आद्य सप्लाअर्स, थळमधील एम.डी. वॉरिअर्स, नागाव येथील सिया वॉरिअर्स, साखरमधील नाखवा वॉटर स्पोर्टस्, अलिबागमधील ए.बी. ग्रुप, साखरमधील प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्ट्स, अलिबागमधील जे.डी. भार्गवी इलेव्हन, दिघोडीमधील अर्जून इलेव्हन या सोळा संघाने सहभाग घेतला आहे.
अंतिम सामान्यानंतर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्या संघाला अलिबाग चॅम्पियन चषक देऊन गौरविले जाणार आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला दोन लाख रुपये, व चषक, द्वीतीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे.
उद्या होणारे सामने
अलिबाग चॅम्पीयन ट्रॉफी 2025चा दुसरा प्रेक्षणीय सामना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी प्रशांत नाईक पुरस्कृत मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि अलिबाग नगरपरिषद यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर ग्रुप सी मधील प्रत्यक्ष उद्घाटनीय सामना त्रिश्राव्य इलेव्हन वरसोली आणि एम.डी. वॉरिअर्स थळ या संघामध्ये होणार आहे. त्यानंतर ग्रुप डी मधील सामना प्रदिप स्पोर्ट्स साखर आणि नाखवा वॉटर स्पोटर्स साखर या संघात होणार आहे. एकूण दहा सामने होणार आहेत.