| मुंबई | प्रतिनिधी |
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांनी तरुणांशी संवाद साधताना, आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करु, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढील 15 दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील, असं सूचक विधानही यावेळेस शरद पवारांनी केलं आहे. 1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही, असंही शरद पवारांनी तरुण सहकार्यांना सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.