| पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत श्रीशिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव गोपाळराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून अफझलखान वधाच्या पोवाडयावर आधारित पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये या पथनाटयांचे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी प्रतिभाउतेकर, स्वाती तासतोडे, प्रणाली पालकर, भाग्यश्री वेल्हाळ, शुभदा जंगम, कृष्णा उतेकर, मनिष माळी, रिया उतेकर, श्रेयस ढवळे, हर्षद जाधव, दिक्षा साळवी, श्रेया गोळे,श्रावणी महाडीक या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून तयारी करून घेतली. प्रतापगडाच्या पोवाडयाच्या ध्वनीमुद्रीकेच्या आवाजावर या कलावंत विद्यार्थ्यांनी हा प्रसंग पोलादपूरच्या बाजारपेठेमध्ये सादर केला.
पोलादपूरात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुक
