जयंत पाटील यांच्याकडून मदतीचा हात

| अलिबाग | प्रतिनिधी |

वादळी वाऱ्यामुळे किहीम येथील अभिषेकनाथ पेडणेकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे पेडणेकर यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले. सामाजिक शासनाच्या एक पाऊल पुढे जात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे पेडणेकर कुटूंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी (दि.19) अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात थैमान घातले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने अलिबाग तालुक्याला देखील झोडपून काढले होते. अलिबाग तालुक्यातील किहीम येथील अभिषेकनाथ पेडणेकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडले. पत्र्याचे खुप नुकसान झाले. पेडणेकर यांच्या घराचे नुकसान झाल्याची माहिती शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांना मिळताच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पेडणेकर यांना आर्थिक मदत केली. शेकापचे संदीप गायकवाड, उपसरपंच मिलींद पडवळ, मनोज म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version