। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे मौजे संगम येथील गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने, ग्रामपंचायत चेंढरेचे माजी सदस्य अजित माळी यांच्या सहकार्याने, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत खंडाळेचे उपसरपंच अशोक थळे, माजी सरपंच नचिकेत कावजी, सदस्य नरेश गोंधळी, संतोष कनगुटकर, अरुणा भगत, समिक्षा पाटील, रंजीता पाटील, वैदही थळे, सानिया पाटील, अस्मिता नाईक, शेकाप युवा नेतृत्व आशिष बाणे, नैनेश राऊत, सुरज राऊत, स्वप्नील बाणे, विराज राऊत, संतोष बाणे, विघ्नेश राऊत, अमित घाडगे, शुभम राऊत, ओमकार पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर, श्वेत गुळेकर, तेजस राऊत, राहुल पेडणेकर, सर्वेश राऊत, भावेश राऊत, योगेश पेडणेकर, ओम किंगने, प्रशांत नरसोले, अरुण नरसोले, संगम ग्रामस्थ, तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत संगम ग्रामस्थ मंडळ, खंडाळे, सद्गुरू कृपा महिला मंडळ, नवज्योत महिला मंडळ, प्रगती महिला मंडळ, गावदेवी महिला मंडळ व गावदेवी क्रिडामंडळ संगम यांनी केले.