गरजवंतांना मदतीचा हात

| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील मीरा फाउंडेशनच्या माध्यमातून येथील निराधार, विधवा, अपंग यांना दर महिन्याला एकहजार रुपयांची पेन्शन स्वरूपात रक्कम दिली जात असून हा मदतीचा हात मागील डिसेंबर महिन्यांपासून अविरतपणे सुरू आहे. चंद्रकांत चौधरी आणि त्यांच्या पत्नी रेखा चौधरी यांनी सुरू केलेली ही सेवाभावी भूमिका निस्वार्थीपणे सढळ हस्ते मदत करीत आहेत. दर महिन्याला जवळपास 150 गरजवंतांना याचा लाभ मिळत आहे. या कार्यक्रमास प्रमोद नायक, संदिप शिंदे, प्रकाश सुतार,अनिस शेख,खालिद शेख, नितेश कदम,रविंद्र बिरामणे, ज्ञानेश्‍वर बागडे,अकबर मुजावर, निखिल शिंदे,गौरंग वाघेला,आलम मुजावर, अमोल चौगुले, रेखा चौधरी,यांसह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version