| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील विधवांचा सन्मान करणारा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शिंदे आणि रेखा चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. मुलुंड येथील पीस फाउंडेशन चे डॉ चारू शाह व योगेश शाह यांचे मित्र निकुंज गाडा, रिटा जैन, जतीन मारू, जलराम ब्युरो चे दावडा , अल्फा म्यांम यांनी साड्या व इतर भेट वस्तू वाण स्वरूपात दिल्या. सुप्रसिद्ध नृत्यांगना शरली संचेती यांच्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाला सुरवात झाली. विविध मनोरंजनाचे खेळ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुहासिनी शिंदे, अर्चना भिलारे, श्रद्धा रामाणे, निकिता देशमुख गिरीजा शिंदे, कल्याणी शिंदे, अर्चना बिरामने, रिजवाना शेख, वर्षा घाग यांनी विशेष मेहनत घेतली. माजी नगरसेविका प्रियांका कदम, प्रतिभा घावरे, रजनी कदम, स्वाती कुमार, स्नेहा चव्हाण,कामिनी शिंदे, सुहासिनी दाभेकर आदी उपस्थित होत्या.