| पेण | वार्ताहर |
तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनविण्याच्या भांडणातून पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.24) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पेण पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.24) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील शहापाडा धरणाचे परिसरात एका कुटुंबातील पती (40) आणि पत्नी (45) यांच्यामध्ये जेवण बनविण्यावरून वाद झाला. पती आरोपी यांने जेवण न बनविण्याचे कारणावरून पत्नीबरोबर भांडण करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय भिंतीवर आपटून जिवे ठार मारले. याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपीस 25 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि संदीप बागुल हे करीत आहेत.