| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आमच्यासाठी जयंत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो एक भावनिक सोहळा आहे. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले की डोळे नकळत पाणावतात आणि अभिमानाने छाती भरून येते, असे भावनिक उद्गार अभिष्टचिंतन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी काढले. गेली अनेक दशके विधिमंडळात आमदार म्हणून काम करताना भाईंनी सत्तेपेक्षा सर्वसामान्यांच्या न्यायाचा आवाज बुलंद केला. गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत विकास पोहोचावा, प्रत्येक घरात रस्ता, पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. त्यांनी असंख्य विकासकामे केली; पण त्यावर स्वतःचे नाव कोरण्याचा किंवा प्रसिद्धीचा कधीही हव्यास ठेवला नाही. म्हणूनच जयंत पाटील हे केवळ नेते नाहीत, तर हजारो कुटुंबांचा आधार, संघर्षातील आशेचा किरण आणि सर्वसामान्यांच्या मनातील विश्वासाचे नाव असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता: प्रफुल्ल पाटील
