आरोपीच्या अटकेसाठी आज मोर्चा निघणार

| नेरळ | प्रतिनिधी |
सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून अपमानकारक पोस्ट फेसबुकवर टाकणार्‍या महिलेला अटक करावी या मागणीसाठी बौद्ध समाजाच्यावतीने बुधवारी (21 सप्टेंबर) तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकरणी बौद्ध समाजाकडून नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.मात्र महिना झाला तरी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही.

त्यामुळे संपुर्ण कर्जत तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक झाला आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर बौद्ध समाजाचा सर्व कार्यकर्त्यांनी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. कर्जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून हा मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयांत जाणार आहे..पोलिसांना निवेदन देताना ड कैलाश मोरे,सुभाष गवळे,राहुल डाळिंबकर, मारुती गायकवाड,फिर्यादी किशोर गायकवाड,आदी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version