। नेरळ । प्रतिनिधी ।
बिहार राज्यातील बुद्धगया येथे बौद्ध भिकू यांच्याकडून महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत येथे आंबेडकर चळवळीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेला हा मोर्चा कर्जत स्टेशन रस्त्याने बाजारपेठेतून लोकमान्य टिळक चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचला. त्यांनतर कर्जत पोलीस ठाणे आणि प्रांत अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाबोधि महाविहार ब्राम्हणी कर्मकांडापासून मुक्त करुन बौद्धांच्या हाती देण्यात यावे. बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यात यावे. तसेच, महाबोधी महाविहारात वैदिक कर्मकांडकरुन बौद्धाचे श्रध्दाभावना दुखवणारे पंडे पुरोहित यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.