| जळगाव | वृत्तसंस्था |
जळगावमध्ये एका 40 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धार्थ वानखेडे असे त्या आरोपीचे नाव असून गुन्ह घडल्यानंतर त्याने लागेच मुंबईला पळून केला होता. मात्र पोलिसांनी शोध घेत त्या नराधमला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी 11 वर्षांची असून ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत लपंडाव खेळत होती. खेळता खेळता लपायला ती अचानक एका घरात शिरली. तीच संधी साधून आरोपीने घराचा मुख्य दरवाजा लावला, घरातले सगळे दिवे बंद केले आणि त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिने प्रतिकार करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे तोंड दाबले. शांत राहिली नाहीस तर तुला जीव घेईल अशी धमकीही त्याने तिला दिली.
या अत्याचारामुळे पीडित मुलीला मोठा धक्का बसला. काही दिवसांनी तिने तिच्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी वानखेडे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र गुन्हा घडल्यानंतर संशयत आरोपी हा मुंबईला पळून गेला होता. अखेर पोलिसांनी अथक तपास करून त्याला मुंबईतून अटक केली.