पनवेलमध्ये इसमाची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल एसटी स्टँड परिसरात एका इसमाच्या गळ्यातील व हातातील सोन्याची चेन व अंगठी असा मिळून जवळपास 90 हजारांचा ऐवज फसवणूक करून एक अज्ञात इसम घेऊन गेल्याची घटना घडली आहे. भगवान गायकवाड (वय-54, धंदा-रिक्षाचालक) हे पनवेल एसटी स्टँड विसावा हॉटेल समोरील रस्ता ते कळंबोली गाव दरम्यान यातील आरोपी इसमाने त्यांच्या गळ्यातील व हातातील सोन्याची चेन व अंगठी हे दागिने सँपल म्हणून वजन काट्याच्या मशिनवर ठेवण्याच्या बहाण्याने फसवणूक करून तो इसम निघून गेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version