| नेपाळ | वृत्तसंस्था |
नेपाळची राजधानी काठमांडूत सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान बुधवारी (दि.24) सकाळी 11 वाजता क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. टेकऑफ घेत असताना या विमानात 19 प्रवासी होते त्यापैकी 18 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हे विमान काठमांडू वरुन पोखरा येते जात होते. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना सौर्य एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून टायर फुटल्याने घसरल्याची दुर्घटना घडली आहे.
प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; 18 जणांचा मृत्यू
