खोपोलीत आढळला दुर्मिळ खापर खवल्या साप

। खोपोली । प्रतिनिधी ।
सर्पमित्र अरविंद गुरव हे खोपोली शहरातील सायमाळ या ठिकाणी गेले असताना त्यांना पूर्ण वाढ झालेला खापर खवल्या जातीचा बिनविषारी साप आढळून आला. भौगोलिक आणि जैविक संरचनेनुसार खापर खवल्या (शिल्ड टेल) जातीचा बिनविषारी साप हा थंड हवेच्या ठिकाणी आढळतो. मात्र खोपोलीसारख्या शहरांमध्ये तो आढळल्याने सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अ

शा प्रजातीच्या सापाच्या अधिवासामुळे खोपोलीतील जैविक वैविध्य अजूनही शाबूत असल्याची सकारात्मक जाणीव होत असल्याचे सर्पमित्र आणि अभ्यासक अरविंद गुरव यांनी यावेळी सांगितले. खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नितिन कराडे आणि शीतल साळुंखे यांच्या उपस्थितीत अरविंद गुरव यांनी दिनेश ओसवाल, सुनील पुरी, सुशील गुप्ता, गुरुनाथ साठेलकर आणि शाहिद शेख यांच्या समवेत अभ्यासपूर्ण चर्चा करुन खापर खवल्या जातीचा साप सुरक्षीत वनक्षेत्रात मुक्त केला.

Exit mobile version