। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने सहाण बायपास या ठिकाणी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची भव्य संवाद मेळावा शुक्रवारी (दि. 27) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.
रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, बेली, बेलकडे, ढवर, सहाण, बामणगाव, कावीर, खानाव या ग्रामपंचायतींसाठी हा मेळावा होणार आहे. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मेळाव्यात मोठया संख्येने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.