| नेरळ | वार्ताहर |
माथेरान येथून नेरळ हुतात्मा चौकातून कर्जतकडे जाणार्या खासगी प्रवासी गाडीला एक तीन चाकी रिक्षा धडकली. कार हि धीम्या गतीने पुढे जात होती, त्यामुळे तीन चाकी रिक्षा मधील प्रवासी यांनी किरकोळ जखम झाल्या. हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी नेरळ टॅक्सी संघटना आणि हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे गेली अनेक वर्षे करीत आहेत.
माथेरान येथे सध्या पर्यटक हंगाम असून तेथे मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन येत असतात. त्या वाहनांची ये जा हुतात्मा चौकातून होत असते. गुरुवार 4 मे रोजी सकाळी माथेरान येथून एक प्रवासी कार मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. हुतात्मा चौकातुन हि कार मुंबईकडे जाणयासाठी कर्जत दिशेने वळत असताना कर्जतकडून एक तीन चाकी रिक्षा वेगाने येत होती. त्यावेळी माथेरान कडून येणारी कार आणि कर्जतकडून नेरळ गावाकडे आलेली रिक्षा यांची धडक झाली. त्यानंतर हि रिक्षा एका बाजूने कलंडली आणि ती साधारण 20 मीटर घरंगळत गेली. या अपघातात रिक्षा मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेतले.
हुतात्मा चौकात कारला रिक्षाची धडक
