एक धाव आरोग्यासाठी ज्येष्ठांसाठी क्रिकेट स्पर्धा

| पाली | गोमाशी |
एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून 50 वर्षे वरील खेळाडूंचा क्रिकेट धमाका अरुण कुमार वैद्य क्रीडांगण पाली येथे पन्नास वर्षावरील वरील मोहोपाडा पाताळगंगा यांनी आयोजित केले होते.

या स्पर्धेत कोकण विभागातील 50 वर्षावरील सहा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी बल्लाळेश्‍वर पाली चषक माजी नगराध्यक्षा गीताताई पालरेचा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमीनी गर्दी केली होती.या स्पर्धेतील खेळाडूंना चहा,नाष्ठा ,जेवणाची सोय रसायनी मोहोपाडा पाताळगंगा या 50 वर्षावरील आयोजकांनी केले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी नवी मुंबई तर द्वितीय क्रमांक उलवानोड या संघाने पटकावले .या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज दत्ता भगत,उत्कृष्ट फलंदाज नागेश,उत्कृष्ट गोलंदाज शशी या खेळाडूंस देण्यात आले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण पालीच्या माजी नगराध्यक्षा गीताताई पालरेचा ,अनुपम कुलकर्णी,नगर सेवक सुलतान बेनसेकर, पप्या मोरे,संदेश सोनकर,गणेश शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Exit mobile version