धावत्या गाडीने घेतला पेट

| पनवेल | वार्ताहर |

चालत्या कारने पेट घेतल्याची घटना खारघरमध्ये घडली असून यामध्ये कारचा समोरील भाग जळून खाक झाला. या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खारघरमध्ये राहणारे अनिल कुलकर्णी हे सकाळच्या सुमारास आपल्या कारने सेंट्रल पार्ककडून उत्सव चौकाकडे जाताना प्रणाम हॉटेलजवळ त्यांच्या धावत्या कारमधून धूर येऊ लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी कुलकर्णी तात्काळ चारचाकीमधून बाहेर पडले. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Exit mobile version