दोन दुकानांना भीषण आग

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहरातील एमजी रोड येथील टपाल नाक्यावरील दोन दुकानांना आग लागल्याने यात लाखोंचा ऐवज जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, यात एका पक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.

हुसैनि हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स पनवेल या हार्डवेअरच्या दुकानाला सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. त्यानंतर बाजूला असलेल्या बुर्‍हानी ट्रेडर्स या दुकानाला देखील आग लागली. या आगीची माहिती माजी नगरसेवक राजू सोनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी अग्निशामक दलाला दिली. लागलेली आग सिडको अग्निशमन केंद्र नवीन पनवेल कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी यांनी पूर्णपणे विझवली. तसेच, शेजारी असलेल्या फिश टँक व पक्षी असलेल्या दुकानामध्ये 10 पक्षी, 35 फिश टँक (50,60 मासे असलेले) माश्यांसह वाचवण्यात यश मिळाले आहे. या आगीत एक पक्षी मृत झाला आहे. ही आग विझवण्याकरिता सिडको अग्निशमन केंद्र नवीन पनवेल येथील फायर इंजिन सह अग्निशमन प्रणेता के.ए.राठोड, अग्निशमन प्रणेता व्ही.आर. खंडागळे, फायरमन एस.बी. म्हात्रे, एस.एम. पड्याळ, एच.के. मात्रे, वाय.टी. शिंदे यांनी आग विझवण्यासह मासे व पक्षांची सुटका केली. आगीमध्ये दुकानातील हार्डवेअर मटेरियलचे जळून खूप मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version