| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरातून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संकेत राणे यांनी त्यांचे मालकीची 70 हजार रुपये किमतीची बजाज मोटार सायकल ही यश कमल हौसिंग सोसायटी येथे उभी करून ठेवली असता आरोपी प्रफुल्ल पळसपगार (25) कळंबोली याने गाडीचे लॉक तोडून चोरून नेली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, हजरत पठाण, पोहवा वायकर, पोना प्रविण मेथे, पोशि मोकळ, पोशि कराड आदींच्या पथकाने या परिसरात गस्त घालत असताना त्यांना सदर गुन्हेगार हा चोरीच्या मोटार सायकलसह सापडल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीची मोटारसायकल, लोखंडी कानसा तुकडा व मोबाईल फोन हस्तगत केला आहे. सदर मोबाईल फोन सुद्धा त्याने कळंबोली येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोटारसायकल सराईत चोर अटकेत
