भरधाव कारची पाच मोटारसायकलला धडक; तीघे गंभीर जखमी

| उरण | वार्ताहर |

उरण द्रोणागिरी नोड येथील देवकुपा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पाच मोटारसायकलना जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी घडली आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार चालक पळून गेला असून अपघात हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याने पोलीस अपघातग्रस्त कारचा शोध घेत आहेत.

उरण द्रोणागिरी नोड येथील देवकुपा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला व पाच मोटारसायकलना जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी(दि.24) रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना नागरिकांनी तत्काल जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात हा येवढा भयानक होता की रस्त्यावर उभे असलेले नागरिक थोडक्यात बचावले आहेत. मात्र, अपघातग्रस्त कार चालक पळून गेला असून अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याने पोलीस अपघातग्रस्त कारचा शोध घेत आहेत.

Exit mobile version