| पनवेल | वार्ताहर |
भरधाव कंटेनरने पुढे जाणार्या मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघतात मोटार सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बोर्ले शेडुंग टोल नाका परिसरात घडली आहे.
अजित मांडे हा खारघर येथून जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन बोर्ले शेडुंग टोल नाका परिसरातून जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनर चालक दिपक राजभर याने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अजित मांडे हा जखमी होवून त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पनवेल पोलीस करीत आहेत.