कारचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

। चंद्रपूर । वृत्तसंस्था ।

चंद्रपुर शहरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर पहाटेच्या सुमारास घडली. अर्टिगा कारने काही तरुण चंद्रपूरवरून जिवतीकडे जात होते. दरम्यान, गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर येथे रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. भरधाव अर्टिगा कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सुरज गव्हाले (22), सुनील किजगीर (27), आकाश पेंदोर (22) आणि श्रेयश पाटील (22) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अजय गायकवाड हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.

Exit mobile version