कॉईल चोरीच्या प्रयत्नात चोरटा जळून खाक

| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील महाड-भोर-पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे गावाजवळ पहाटेच्या सुमारास चालू प्रवाहातील ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल चोरीच्या प्रयत्नात अज्ञात चोरट्याचा शॉक लागून संपूर्ण शरीराचा कोळसा होऊन मृत पावल्याची घटना सकाळी घडली. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे या घटनेचा तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलादपूर तालुक्यात अनेक गावांत ट्रान्सफॉर्मरमधील कॉईल चोरी करणारी टोळी सक्रिय असून, त्याचा तापमान आजपर्यंत लागलेला नाही.

त्याची पुनरावृत्ती महाड तालुक्यात होण्यास सुरुवात होण्याअगोदरच अज्ञात टोळीमधील एकाचा मृत्यू होण्याची घडली आहेत्र महाड-पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे गावाजवळ रस्त्यावर असणार्‍या ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल चोरी करून पहाटेच्या सुमारास पशार होण्याच्या तयारीत असणार्‍या अज्ञात टोळीमधील एकाचा शॉक लागून संपूर्ण शरीर काळे ठिक्कर होऊन मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व पोलादपूर तालुक्याचे विद्युत यांच्या सहकार्याने पोलीस तपास चालू असून, अज्ञात व्यक्तीचे अद्याप नाव समजले नाही. महाड व पोलादपूर तालुक्यात गावोगावी ट्रान्सफार्मरमधील कॉइल चोरीच्या घटना वाढत चालल्या असताना आज ईशाने कांबळे गावाजवळ झालेल्या घटनेमुळे अज्ञात टोळीचा तपास लागण्यास यामुळे मदत होणार असल्याची समजते.

Exit mobile version