साडेचौदा तोळे सोने चोरणारा चोरट्या गजाआड

खालापूर पोलिसांकडून सोने कुटूंबियांच्या स्वाधीन
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील नावंढे व घोडीवली परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी चोरीच्या घटनेतील सोन्याच्या वस्तू व काही रक्कम लंपास केली होती, या सर्व घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते मात्र खालापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम जलद गतीने सुरू ठेवत नावंढे गावातील सिसिटिव्हि कँमेरेच्या फुटेजवर चोरट्याचे स्केच बनवून या चोरट्याला गजाआड करून त्याच्या जवळील सोन्याचे दागिने मिळविण्यात खालापूर पोलिसांना यश मिळाल्याने शुक्रवारी या फिर्यादी कुटुंबांना साडेचौदा तोळे सोने त्याचे दागिने स्वाधीन केले आहेत त्यामुळे या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले.

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील कालावधीत वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती मात्र घोडीवली व नावंढे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते चोरट्यांनी चोरी करित काही रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामुळे या चोरट्याला पकडणे खालापूर पोलीस पुढे मोठे आव्हान होते, खालापूर पोलीस दिवस रात्र या चोरट्याच्या मागावर असताना रात्रभर जागता पहारा देत होते, परंतु चोर हा शातिर बुध्दी असल्याने तो सर्वाना चकवा देत वेगवेगळ्या पध्दतीने चोरी करतच राहिला. मात्र चोर नावंढे येथील चोरी करताना सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला असता या कँमेरेच्या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांचे स्केज बनवून आपली तपास यंत्रणा जलद गतीने सुरू ठेवली असताना खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्याला जेरबंद करण्यात खालापूर पोलिसांना यश आले असून हा चोरटा मु.पो.शिरबें, जि. सातारा येथील असून त्याचे नाव गौतम विलास माने आहे.

तर या चोरट्याने तीन गुन्हे कबूल केल्याने त्याच्या जवळील चोरी केलेले चैन, झुमके, नथनी, सोन्याचे पान यासह अन्य गठन, पंजन आदी दागिने हस्तगत केल्याने न्यायालयाची प्रक्रिया करून नावंडे येथील घरफोडी झालेल्या धनाजी यशवंत हडप, मनोहर गोठीराम काठावले, महेंद्र लक्षण आगीवले यांना साडेचौदा तोळे सोने या कुटुंबाना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला पोलीस निरीक्षक अनिल विभूते सह्य पो नि गणेश कराड सह्य पो नि स्वप्नील सावंतदेसाई, सह्य पो नि प्रदीप आरोठे, महिला उप पो नि सरला काळे यांनी स्वाधीन केल्याने या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले खालापूर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरिचे तालुक्यातून व या कुटुंबाकडू आभार व कौतुक होत आहे.

खालापूर पोलिसांनी नावंडे येथील चोरी प्रकरण उघडकीस करून पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि टीम ने चोरट्याला शिताफीने गजाआड केले आणि त्याच्या जवळील असणारे सोन्याचे दागिने ही हस्तगत करून चोरी झालेल्या कुटुंबाना परत मिळवून दिल्याने पोलीस खात्याची च्या कामगिरीत मानाचा तुरा रोवल्याने माझ्या सहकाऱ्यांच्या मनाला अभिमान आहे.

– संजय शुक्ला, उप विभागीय पोलीस अधिकारी खालापूर
Exit mobile version