| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा मैदानावर सुरू असलेल्या अलिबाग प्रिमियर लीग या क्रिकेट सामन्यांच्या अखेरच्या दिवशीच्या सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये करण इलेव्हन विरूद्ध ए थ्री सोगाव हा पहिला सामना पार पडला . या झालेल्या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी अतिशय सुंदर अशी खेळी केली असून ए थ्री इलेव्हन या संघाने ही खेळी ५५ धावांनी जिंकली असून हा संघ आता उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.