काशिद-बीच रस्त्यावर झाड कोसळले

। कोर्लई । वार्ताहर ।

गेल्या दोन दिवसांपासून मुरुड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून आज पहाटेच्या वेळेस साळाव-मुरूड रस्त्यावर काशिद-बीच रस्त्यावर जुने मोठे भेंडीचे झाड कोसळले. सकाळच्या वेळेत वाहतूक तुरळक असल्याने सुदैवाने जीवित व वित्तहानी टळली आहे. साळाव-मुरुड रस्त्यावर काशीद-बीच रस्त्यावर भेंडीचे झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता रमेश गोरे यांना झाड पडल्याचे वृत्त समजताच सहायक कनिष्ठ अभियंता गणेश मार्कंड, सहायक कनिष्ठ अभियंता रोशन पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबी व कटरच्या सहाय्याने येथील पडलेले भेंडीचे झाड हटविण्यात येऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version