ईदनिमित्त अनोखा उपक्रम; 60 जणांनी केले रक्तदान

| कर्जत | प्रतिनिधी |

मुस्लिम समाज कर्जततर्फे कर्जत-खालापूर तालुक्यातील 481 वे रक्तदान शिबीर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुस्लिम मस्जिद कर्जत येथे हे शिबीर आयोजित करण्यात होते. याप्रसंगी एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या शिबिरात गणेश मधुसूदन ठोसर यांनी आपले वैयक्तिक 115 वे रक्तदान केले. त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आले. रक्तसंकलानाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त केंद्राचे डॉ. रमेश सिंह, लक्ष्मण नाईक, प्रकाश एवले, लता देशक, वाजीद अली, साहिल पवार, निखिल मौर्या, अनिकेत जाधव, राणी मोरे, संजय ठोंबरे, सायली व इतर सहकाऱ्यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी रनदीम कुरेशी, एजाज मुल्ला, अमीर मणियार, नवाज तांबोळी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सैदू शेख, निसार शेख, हमिद खैराट, वसीम सिद्दीकी, इस्माईल दिवान, रशीद मुल्ला, शादाब शेख, शकील शेख, फरान चौगुले, मोसिन कोतवाल, नदिम खान व इतर मुस्लिम समाजाचे सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version