| महाड | प्रतिनिधी |
जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून कोकरे येथील बालसंस्कार विद्यामंदिर इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पर्यावरण भेटीचा अनुभव घेऊन पर्यावरणाची मैत्री साधली. पर्यावरणाचा विकास आणि संवर्धन यासंदर्भात तेथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कोकरे सुसंस्कार शैक्षणिक चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
महाडचे कृषी पर्यवेक्षक किरण कोकरे, कृषी सहाय्यक प्रियंका सवणे, आकाश रुपनार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्त शिक्षक बागडे यांनी त्यांचा फार्म उपलब्ध करून दिला होता. यावेळी मुख्याध्यापक वैभव सपकाळ, शिक्षिका अमृता सुतार व सुरेखा सपकाळ यांनी उपक्रमाची विद्यार्थ्यांकडून सर्व तयारी करून घेतली. शिक्षिका गौरी सावंत, मीनाक्षी पालांडे, स्मिता मोरे, शिक्षकेत्तर कर्मचारी संदेश मोरे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.