। उरण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील सारडे गावातील गोल्डन ज्युबली मित्र मंडळ (दि.11) मे रोजी 37 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. या 37 वर्षात आजपर्यंत मंडळाच्यावतीने सामाजिक सांस्कृतिक, कला, क्रीडा, निसर्ग संवर्धन, निसर्गसंरक्षण, दुर्ग संवर्धन, स्वच्छता अभियान मोहीम, वृक्ष लागवड अभियान अश्या अनेक प्रकारची समाजपयोगी कार्य साकारले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे यांच्यावतीने निसर्ग संवर्धनाची एक अनोखी गुढी उभारण्यात आली. सारडे गावाच्या तलावाशेजारी असणार्या वडाच्या पारावर वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
वटवृक्ष लागवडीच्या या आदर्शवत कार्यात हिराचंद म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, शशिकांत म्हात्रे, नवनीत पाटील, संजिव माळी, देविदास पाटील, दिनेश म्हात्रे, श्यामकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. या सर्व मंडळींच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली.