माणगावात एकतेचे अनोखे दर्शन

उम्मते मुस्लिमा कमिटीतर्फे अल्पोपहार

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावात ढालघर फाटा येथे शिवजयंतीनिमित्त उम्मते मुस्लिमा कमिटीतर्फे रायगडावर जाणाऱ्या हजारो शिवप्रेमींना अल्पोपहार व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. माणगावमधील मुस्लिम बांधवानी एकत्रित येत चांगला उपक्रम राबवून हिंदू व मुस्लिमा बांधवानी एकतेचे अनोखे दर्शन घडविले. या उपक्रमाचे तालुक्यात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मुस्लिम समाज बांधवानी आयोजित केलेल्या या कार्यक्रम ठिकाणी अँड. राजीव साबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सुभाष केकाणे, राजेश मेहता, अकबर परदेशी, प्रशांत साबळे, सचिन बोंबले, रत्नाकर उभारे, डॉ. परेश उभारे, कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, सिराज परदेशी, सिद्धेश पालकर, मुन्ना येशवीकर, बळीराम खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन मुस्लिम समाज बांधवांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उम्मते मुस्लिमा कमिटीतर्फे बशीर करेल, शादाब गैबी, इरफान हाजीते, इस्माईल पालेकर, सुहेब परदेशी, सरफराज अ़फवारे, सिराज अ़फवारे, फहद करबेलकर, मन्सूर मुकादम, शहानवाज अत्तार, रफिक जामदार, फहीम वाडेकर, नदीम परदेशी, मुसद्दीक जिलानी व सहकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेत हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

Exit mobile version