| पनवेल | वार्ताहर |
पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन अज्ञात इसमांनी बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले असून दुसर्या आरोपीचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदरची पिडीत महिला ही ऑरीयन मॉल समोरील हॉटेल मधून मध्यरात्री सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी इसमांनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनच्या जवळील नवीन पनवेल हद्दीतील पंचशिल नगर येथील एका पडक्या इमारती मध्ये घेऊन गेले. तसेच गुंगीकारक औषध देवून तिच्यावर बलात्कार केला व तिला मारहाण करून सदर पडक्या इमारती मध्ये सोडून निघून गेले. या नंतर सदर पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच घटनेचे गांभार्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शोध पथकाची दोन पथके तयार करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, गुन्हे शाखा पथक 1 व 2 यांनी सदर घटना घडलेल्या ठिकाणा वरील सी.सी.टी.वी. फुटेज तपासले असता, सदर सी.सी.टी.वी. मध्ये दोन इसम सदर पीडित महिलेबरोबर जाताना दिसत होते. सदर इसमा बाबत गुप्त बातमीदारांकडून व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अविनाश चव्हाण (वय 20 वर्ष, रा. पंचशील नगर) यास ताब्यात घेतले व त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच त्याच्या सोबत असलेला दुसरा आरोपी सूरज देवडे उर्फ वाकड्या (रा. पंचशील नगर) याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.