। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे हद्दीतील रेल्वे रुळावर एका तरुणाला रेल्वेची धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.25) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास कोलाड रेल्वे रुळावर पाले खुर्द येथील विशाल बाळकृष्ण जाधव (30) याला नेत्रावती एक्सप्रेसने धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन कोलाड पोलीस ठाण्यात याची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.







