कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

। पुणे । वृत्तसंस्था ।

शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याजवळ बुधवारी (दि.5) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दिपक जालिंदर येठेकर (33) हे रंगनाथ बन्सी आढाव यांच्यासह जेवणाचा डब्बा आणण्याकरिता आपल्या मोटार सायकलने जात होते. त्याचवेळी कवठे येमाई बाजूने पारगावकडे राँग साईडने येणाऱ्या भरधाव इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामधे दिपक येठेकर याचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले रंगनाथ आढाव हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गाडी चालक पसार झाला असून घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Exit mobile version